पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक घेत अर्ध्याच तासात तब्बल १ कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रक्कमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शरद पवारांच्या हाकेला बारामतीकरांचा प्रतिसाद, पूरग्रस्तांसाठी अर्ध्या तासातच जमा केली १ कोटींची मदत
बारामतीतही पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी अर्ध्याच तासात १ कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली.
राज्यातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. बारामतीतही पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून पुरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी अर्ध्याच तासात १ कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. या रोख रक्कमेशिवाय धान्य, कपडे, औषधे आणि गरजेच्या वस्तूही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही सर्व मदत येत्या २ दिवसात सांगली, कोल्हापूरसह विविध भागात पोहोचवली जाणार आहे.
दरम्यान, पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २५ लाख असे एकूण ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रोख स्वरुपात मदत देण्याचे जाहीर केले. तर अनेक संस्था आणि व्यक्तींच्यावतीने वेगवेगळ्या वस्तू स्वरुपातील मदत पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे. येत्या २ दिवसात बारामतीतून आणखी मदत जमा करुन ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.