महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 25, 2023, 9:22 PM IST

ETV Bharat / state

मुंबईत शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव; २७ ते ३१ जानेवारी मोठमोठ्या फिल्म प्रदर्शित

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय येत्या २७ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंबईत एससीओ (शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन) म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाचे, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या माध्यमातून आयोजन करीत आहे.

Shanghai Cooperation Organization Film Festival
मुंबईत शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव; २७ ते ३१ जानेवारी मोठमोठ्या फिल्म प्रदर्शित

मुंबई :एससीओचे भारताकडे असलेले अध्यक्षपद सूचित करण्यासाठी, या एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवात एससीओ देशांचे चित्रपट, स्पर्धा आणि स्पर्धेतर अशा दोन विभागांमध्ये दाखवले जाणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, महोत्सवात मास्टर-क्लास (मार्गदर्शन सत्र) संभाषण सत्र, सदस्य देश आणि भारत यांच्याशी निगडित दालन, छायाचित्र आणि पोस्टर (जाहिरात पत्र) प्रदर्शन, हस्तकला स्टॉल आणि इतर अनेक कार्यक्रम असतील.

एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन :एससीओ चित्रपट महोत्सवाचे आयोजन भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात केले जात असल्याने या महोत्सवाची सुरुवात भारतीय चित्रपटाच्या जागतिक जागतिक प्रीमियरने होईल. या महोत्सवाविषयी सांगताना, अतिरिक्त सचिव नीरजा शेखर म्हणाल्या की, या महोत्सवाचे उद्दिष्ट, एससीओमधील विविध देशांमध्ये चित्रपटविषयक भागीदारी निर्माण करणे आणि या देशांच्या संस्कृतींना जोडणारा सेतू म्हणून काम करणे हा आहे.

२७ ते ३१ जानेवारीदरम्यान मुंबईत शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव

चित्रपट व्यवसायिकांमध्ये समन्वय :यामुळे एकमेकांच्या चित्रपट विषयक अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट व्यवसायिकांमध्ये समन्वय निर्माण होईल. एससीओ चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या सदस्य राष्ट्रांमधील चित्रपटांमधून प्रेक्षकांना विविध संस्कृतींचा अनुभव घेता येईल आणि एससीओ देशांतील लोकांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी हे चित्रपट म्हणजे एक सामाईक चौकट ठरेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

चित्रपटांचे खेळ मुंबईत दोन ठिकाणी :या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ २७ जानेवारी रोजी मुंबई एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात राष्ट्रीय कलाविष्कार केंद्र) च्या जमशेद भाभा प्रेक्षागृहात होणार आहे. चित्रपट महोत्सवातील चित्रपटांचे खेळ मुंबईत दोन ठिकाणी होतील. पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजन संकुलातील ४ प्रेक्षांगार आणि वरळीच्या नेहरू तारांगण इमारतीमधील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एनएफडीसी (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) चे प्रेक्षागृह अशी ही दोन ठिकाणे आहेत.

अनेक पुरस्कार जाहीर :स्पर्धा विभाग हा फक्त एससीओ सदस्य राष्ट्रांसाठी आहे. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपट) स्पेशल ज्युरी अवॉर्ड (विशेष परीक्षक पुरस्कार) अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. स्पर्धेतर विभाग सर्व एससीओ देशांसाठी, म्हणजे संघटनेचे सदस्य देश, निरीक्षक देश आणि सदस्य देशांशी संवाद साधणारे भागीदार देश यांच्यासाठी विविध श्रेणीमध्ये आहे.

एससीओ चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट :निखिल महाजन दिग्दर्शित सर्वाधिक प्रशंसित मराठी चित्रपट गोदावरी आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीतील ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेश मिळालेला 'लास्ट फिल्म शो' म्हणून ओळखला जाणारा गुजराती चित्रपट 'छल्लो शो' स्पर्धा विभागात दाखवला जाईल. यासोबतच सुजित सरकारचा सरकार उधम, एस. एस. राजामौलींचा आरआरआर, एनसीओ चित्रपट महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

'या' प्रकारातील सर्व चित्रपट दाखवले जाणार :डायरेक्टर फोकसमधील संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठीयावडी, चिल्ड्रन फोकसमधील मृदुल टूलसीदासचा टूलसीदास ज्युनिअर आणि चेतन भाकूनी यांचा जुगलबंदी हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. शिवाय पाच पुनर्संचयित क्लासिक चित्रपटदेखील महोत्सवात प्रदर्शित केले जातील. शतरंज के खिलाडी (१९७७ हिंदी), सुबर्णरेखा (१९६५, बंगाली), चंद्रलेखा (१९४८ तमिळ), इरू कोडगुल (१९६९, तमिळ) आणि चिदंबरम (१९८५ मल्याळम) यांचा त्यात समावेश असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details