महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्गमित्रांनीच विद्यार्थ्याला बदडले, वर्गात प्रश्नांची उत्तरे देतो म्हणून मारहाण केल्याचा आरोप

वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो देत होता. त्यामुळे शिक्षक बाकीच्यांना रागवत होते. चिडलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यालाच बदडले. एवढेच नाही तर गायब करू, अशी धमकीही दिली. हा प्रकार पुण्यातील एका नामांकित शाळेत घडला.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jan 29, 2020, 12:43 PM IST

Updated : Jan 29, 2020, 12:51 PM IST

पुणे- सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुला कशी काय येतात? तुझ्यामुळेच आमच्यावर शिक्षक ओरडतात, असे म्हणत आठवीत शिकणाऱ्या सात अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला बेदम मारहाण केली. ही घटना 22 नोव्हेंबर, 2019 रोजी पुण्याच्या हडपसर परिसरातील नामांकित शाळेत घडली. पीडित मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आपला 15 वर्षीय मुलगा हडपसर परिसरातील नामांकित शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी शाळेच्या मधल्या सुट्टीत आरोपी 7 अल्पवयीन मुलांनी पीडित मुलाला पकडले. तुला सगळेच येते, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू का देतोस?, तुझ्यामुळेच शिक्षक आमच्यावर रागवतात, असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि खिडकीच्या पडद्याचा पाईप काढून बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर तुला गायब करून टाकतो, अशी धमकीही दिली,' असे पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

हेही वाचा - त्याने दीड लाख तांदळाच्या दाण्यांवर लिहिले 'राम' नाम; गिनीज बुकात नोंद

पीडित मुलाने काही दिवसांनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक ए. सी. जोगदंड अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - राजगुरुनगर बसस्थानकात युवकाला गावठी पिस्तूलासह अटक

Last Updated : Jan 29, 2020, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details