पुणे - कोरोना विषाणूचा समुह संसर्ग टाळण्यासाठी तीन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन राजगुरुनगर नगरपरिषदेने केले होते. या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून आज दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. संपुर्ण राजगुरुनगर शहरात त्यामुळे शुकशुकाट होता. कोरोनाचा समुह संसर्ग टाळण्यासाठीची ही पहिली पायरी राजगुरुनगरकरांनी यशस्वीरित्या पुर्ण केली असल्याचा विश्वास नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या बंदमुळे भिमाशंकर, शिरुर, पुणे-नाशिक हे सर्व मार्ग बंद झाले आहेत.
नगरपरिषदेच्या आवाहनानंतर राजगुरुनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद... हेही वाचा...लाॅकडाऊन: सोमय्या मैदानावरील भाजीपाला बाजारात 'सोशल डिस्टन्स'चा तीनतेरा
राजगुरूनगर शहरात तीन दिवस पूर्णतः बंद पाळण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले होते. त्यानंतर बंदच्या दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळला असुन 100 टक्के बंद पाळण्यात आला. देशात लॉकडाऊन आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. राजगुरूनगर शहरात पोलिसांच्या माध्यमातून शहरात येणाऱ्या नागरिकांना रोखण्यात येत आहे. शहरातील नागरिकही रस्त्यावर येत नसल्याने सर्व रस्ते सामसूम झाले आहेत.
शहरात काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक त्या सेवासुविधा घरपोच देण्यात येत आहेत. मेडिकल व खासगी दवाखाने मात्र सुरू आहेत. अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यांच्या गाड्या जप्त केल्या जात आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांनी घराबाहेर पडु नका, किराणा, भाजीपाला, अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी स्वयंसेवक काम करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले आहे.