पुणे - दहा महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा सुरू झाली असून कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून विद्यार्थांना प्रवेश दिला जात आहे. यावेळी फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे शाळा मुख्यद्यापिका साधना वाघमारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, पालकांचे संमतीपत्र मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण -
अवघ्या महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतची शाळा सुरू झाली नव्हती. अखेर आज शाळा सुरू झाल्या असून प्रशासनाने पूर्ण तयारी करत विद्यार्थ्यांचे फुलांची उधळण करत स्वागत केले. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते.