पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार आणि खडकी बाजूकडील दुसरे प्रवेशद्वार गुरुवारपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केल्यानुसार गेल्या काही काळात विद्यापीठ परिसरातील शेकडो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर ये-जा करत आहेत त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे जबाबदारीने वागणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जीवन धोक्यात घालण्यासारखे आहे त्यामुळे गुरुवार 9 एप्रिलपासून पुणे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि खडकी गेट पुढील आदेशा पर्यत बंद करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेशापर्यंत बंद
विद्यापीठ परिसरातील शेकडो कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय बाहेर ये-जा करत आहेत त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे जबाबदारीने वागणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जीवन धोक्यात घालण्यासारखे आहे त्यामुळे गुरुवार 9 एप्रिलपासून पुणे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि खडकी गेट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठ प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू भाजीपाला उपलब्ध करून दिला जातो आहे. मात्र, तरीही काही कर्मचारी त्यांचे कुटुंबीय बेजबाबदारपणे वागत असून, विद्यापीठाबाहेर ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठाकडून हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. अत्यावश्यक बाब असेल तर त्यासाठी प्रशासनाच्या सुरक्षा विभागाकडून पास दिला जाणार आहे. तसेच एका कुटुंबाला आठवड्यातून दोन पास मिळतील आणि रुग्णांना रुग्णवाहिकेतूनच बाहेर सोडले जाणार असल्याचे विद्यपीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.