महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BS-4 वाहन घेताना ही घ्या काळजी; 31 मार्चनंतर नोंदणी होणार बंद

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाने BS-४ इंजिन प्रकाराच्या वाहनांची नोंदणी 31 मार्चनंतर करण्यास बंदी घातली आहे. सध्या बाजारात BS-६ प्रकारातील वाहने उत्पादित केली जात असून त्यांची विक्री केली जात आहे. BS-४ प्रकारातील वाहनांचे उत्पादन न करण्याचे आदेश यापूर्वीच कंपन्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, ज्या वितरकांकडे BS-४ वाहनांचा स्टॉक आहे ते वितरक अशा गाड्या ऑफर देऊन विकत आहेत.

By

Published : Mar 14, 2020, 10:38 AM IST

pune
BS-4 वाहन घेताना ही घ्या काळजी; 31 मार्चनंतर नोंदणी होणार बंद

पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 मार्चनंतर BS-४ इंजिन प्रकारच्या वाहनांची नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वाहन खरेदी करताना त्या वाहनाची नोंदणी 31 मार्चपूर्वी होणे आवश्यक असून त्यानंतर BS-४ इंजिन प्रकारचे वाहन खरेदी केल्यास त्याची नोंदणी होणार नसल्याचे पुण्याचे परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी स्पष्ट केले.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाने BS-४ इंजिन प्रकाराच्या वाहनांची नोंदणी 31 मार्चनंतर करण्यास बंदी घातली आहे. सध्या बाजारात BS-६ प्रकारातील वाहने उत्पादित केली जात असून त्यांची विक्री केली जात आहे. BS-४ प्रकारातील वाहनांचे उत्पादन न करण्याचे आदेश यापूर्वीच कंपन्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, ज्या वितरकांकडे BS-४ वाहनांचा स्टॉक आहे ते वितरक अशा गाड्या ऑफर देऊन विकत आहेत. परंतू या वाहनांची नोंदणी 31 मार्चच्या पूर्वी न झाल्यास त्या स्क्रॅप होणार आहेत.

हेही वाचा -कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल

त्यामुळे नागरिकांनी वाहन खरेदी करताना खबरदारी घेण्याची गरज आहे. अजित शिंदे म्हणाले, BS-४ इंजिन असणाऱ्या वाहनांची नोंदणी 31 मार्चपूर्वी होणार असेल तरच नागरिकांनी या इंजिन प्रकारचे वाहन खरेदी करावे. त्यामुळे शक्यतो 31 मार्चच्या एक आठवडापूर्वी वाहन खरेदी करावे. तसेच त्याची नोंदणी 31 मार्चच्या आधी होईल, याची खात्री करावी. 21 मार्चनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कुठलीही सुट्टी न घेता सुरु राहणार आहे. या काळात गाड्यांची नोंदणी केली जाणार आहे.

हेही वाचा -VIDEO : शिवनेरी किल्ल्यावर ट्रेकिंग करताना तरुणी कड्यावरून घसरली; थरार कॅमेरात कैद

दरम्यान, या काळात आरटीओचे सर्वर डाऊन झाल्यास किंवा इतर काही अडचणी आल्यास आणि वाहनाची नोंदणी 31 तारखेच्या आत न झाल्यास आरटीओ जबाबदार राहणार नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details