पुणे-एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शनिवार दाखल करण्यात आला असून सध्या मतीन रसीद सय्यद हा एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.
एमआयएमच्या माजी नगरसेवकावर चाकणमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल
एमआयएमचा नगरसेवक मतीन रसीद सय्यद याच्यावर औरंगाबाद येथे याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असुन त्या गुन्ह्यात रसीद हा औरंगाबाद कारगृहात न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्याच्यावर बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन नोव्हेंबर १८ ते फेब्रुवारी १९ दरम्यान आई आजारी असल्याचे सांगून एमआयएम नगरसेवकासह दोघांनी पिडित महिलेला कारमधून औरंगाबादला नेले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. त्यानंतर लॉजवर नेऊन विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पिडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून मतीन रसीद सय्यद, नगरसेवक एमआयएम व हमीद सिद्धिकी मोहसीन रसीद सिद्धिकी (तिघेही राहणार औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयएमचा नगरसेवक मतीन रसीद सय्यद याच्यावर औरंगाबाद येथे याआधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्या गुन्ह्यात रसीद हा औरंगाबाद कारगृहात न्यायालयीन कोठडीत आहे.