पुणे :पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या फियाट कंपनीत मैलामिश्रीत पाण्यात बुडून दोन कामगारांचा मृत्यू ( Two laborers died after drowning in muddy water ) झाला होता. या प्रकरणी पोलीसांकडून या प्रकरणी ठेकेदाराला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ( Three workers died of suffocation )
काम करत असताना 'या' तिन्ही कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला :गजानन कुरमभट्टी वय 40 राहणार वाघोली मूळ राहणार नाडेड असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे . या घटनेत नितीन प्रभाकर गौड वय 45, गणेश पाईकराव वय 40, राहणार वाघोली मूळ नाडेड आणि सतीशकुमार नाथूराम वाल्मिक वय 40 राहणार उत्तरप्रदेश अशी या घटनेत मयत झालेल्या कामगारांची नावे आहेत. कुरमभट्टी हा या प्रकल्पाचा मूळ ठेकेदार आहे. कामगारांना कामाला लावून तो दिवाळीसाठी त्याच्या मूळ गावी गेला होता. त्याचवेळी पाडव्याच्या दिवशी काम करत असताना या तिन्ही कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला.