महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : पुण्यात असा साजरा केला जातोय रमजान

रमजान महिना इस्लाम महिन्यातील पवित्र असा महिना समजला जातो. या महिन्याला विशिष्ट एक दर्जा देण्यात आला आहे. रमजान महिन्यात जास्तीत जास्त परमेश्वर (अल्लाह) ची इबादत करावी लागते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकजण हे आपआपल्या घरीत नमाज पठन करत आहेत.

By

Published : May 5, 2020, 12:59 PM IST

Updated : May 5, 2020, 7:20 PM IST

लॉकडाऊनमध्ये असा साजरा केला जातोय रमझान
लॉकडाऊनमध्ये असा साजरा केला जातोय रमझान

पुणे - सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. देशात तसेच राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी मशिदीत जाता येत नाही. तसेच मित्र-मैत्रिणी नातेवाईकांकडे जाऊनही रमजान साजरा करता येत नाहीये. अशा वातावरणातही घरच्या घरी मुस्लिम बांधवांकडून रमजान साजरा केला जात आहे.

मौलाना शबी एहसन काझमी यांच्याशी बातचीत करताना प्रतिनिधी

मौलाना शबी एहसन काझमी हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. ते मौलाना असल्याने सर्वसाधारण दिवसात पाचही वेळची नमाज ते मशिदीत पठण करत असतात. पण, यंदा रमजानमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने मौलाना हे घरीच कुटुंबियांबरोबर नमाज पठण, कुरआन पठण करत आहेत. त्यांच्या घरातील सर्व लोक हे रोज एकत्रित येत नमाज, कुरआन पठण करतात. याबद्दल बोलताना मौलाना म्हणाले, आयुष्यात मी अशी परिस्थिती कधीही बघितली नाही. प्रथमच घरात नमाज पठण करावं लगत आहे. या पवित्र महिन्यात आम्ही घरचे सर्वजण एकत्र येत रोजा इफ्तार करतो व मग नमाज पठण करून कुरआन पठण करतो, अशी भावना यावेळी मौलाना शबी एहसन काझमी यांनी व्यक्त केल्या.

पुण्यात असा साजरा केला जातोय रमजान

रमजान महिना इस्लाम महिन्यातील पवित्र असा महिना समजला जातो. या महिन्याला विशिष्ट एक दर्जा देण्यात आला आहे. रमजान महिन्यात जास्तीत जास्त परमेश्वर (अल्लाह) ची इबादत करावी लागते. संध्याकाळी रोजा इफ्तारच्या वेळी विविध खाद्यपदार्थ बनवून एकत्र व नातेवाईकांसोबत रोजा इफ्तार करत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकजण हे आपआपल्या घरीत नमाज पठन करत आहेत.

Last Updated : May 5, 2020, 7:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details