महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी पाऊल पडते पुढे... कोरोना चाचणी कीट तयार करुनच 'रणरागिणीने' दिला बाळाला जन्म

विक्रमी वेळात कोरोना चाचणी किट तयार करण्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. पुण्यातील मिनल दाखवे-भोसले यांनी प्रसव काळ असताना हे किट विकसीत केले. किट विकसित केल्यानंतर त्यांना बाळाला जन्म दिला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Mar 28, 2020, 3:27 PM IST

पुणे- सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना चाचणीचे कीट आयात करावे लागत होते. त्यामुळे चाचणीचा अहवाल येण्यास उशीर होत होता. यामुळे यावर मात करण्यासाठी माय लॅब फार्मा कंपनीने कीट विकसीत करण्यास सुरुवात केली. यामध्ये संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून मिनल दाखवे-भोसले या गरोदर असताना हे कीट विकसीत केले आहे.

हे कीट विकसीत करत असताना प्रसुतीसाठी केवळ काहीच कालावधी शिल्लक राहिला होता. पण, मिनल यांनी याची पर्वा न करता कीट विकसीत करण्याचे काम सुरूच ठेवले. कीट विकसीत झाल्यानंतर त्याला मान्यताही मिळाली आहे. कीट विकसीत झाल्यानंतर काही वेळातच मिनल यांनी बाळाला जन्म दिला.

हेही वाचा -दिलासा..! पिंपरी-चिंचवडमधील 5 कोरोनाग्रस्तांची पहिली चाचणी निगेटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details