पुणे :पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या परिसरात २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अथर्व सुनील लाडके (वय २०, रा. सिंहगड व्हॅली, आंबेगाव बुद्रुक) हे त्याच्या मित्रासोबत (Pune Crime) गप्पा मारत बसले होते. (created terror by force of arms) या दरम्यान आरोपी करण दळवी आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड यांनी लोखंडी कोयता फिरवीत जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना धाक दाखविला होता. (Main accused arrested from Beed)
Pune Crime : सिंहगड कॅम्पसमध्ये कोयत्याने दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य आरोपीला बीडमधून अटक
सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २८ डिसेंबरच्या रात्री कोयता घेऊन दहशत निर्माण (created terror by force of arms) करणाऱ्या प्रमुख आरोपीला बीड येथून भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक (Main accused arrested from Beed) केली आहे. करण अर्जुन दळवी (वय २१, रा. माणिक बाग, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime)
शस्त्राच्या धाकावर लोकांना धमकविले :आरोपीने दुकानांच्या शटरवर आणि हातगाड्यांवर कोयत्याने वार करून नुकसान केले होते. यानंतर लोकांनी घाबरून दुकाने बंद केली. आरोपी करण दळवीने तन्मय ठोंबरे याच्यावर मानेवर कोयत्याने वार करून जखमी केले होते. त्याचवेळी सिंहगड रोड पोलिसांच्या मार्शल ड्युटीवरील पोलिसांनी पाठलाग करून यातील सुजित गायकवाड याला पकडून त्याला बेदम चोप देत भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केले होते.
गुप्त माहितीच्या आधारे अटक :मुख्य आरोपी हा करण हा पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांना करण हा बीडमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बीड येथून त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.