पुणे :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात (bandh against governer Governor Koshyari) आहे. त्या पार्श्वभूमीवर काल पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. येत्या 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक (Pune bandh) देण्यात आली होती. आत्ता या पुणे बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला असून दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील सर्वच दुकाने बंद असणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले आहे.
बंद ठेवून पाठिंबा :आज झालेल्या व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुणे बंदमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी तीनपर्यंत दुकाने बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले (bandh against Governor Koshyari) आहे.
आवाहनाला प्रतिसाद :संभाजी बिग्रेड कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,आर.पी.आय. या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले होते. आज या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी महासंघाने देखील या बंदला पाठिंबा जाहीर केला (Pune bandh supported by trade union) आहे.