पुणे - पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिवसभरात (25 एप्रिल) दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून लाच स्वीकारनाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि एका खासगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून पकडले. वानवडी आणि शिक्रापूर येथे ही कारवाई करण्यात आली. एकाच दिवशी तिघे जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
लाचखोर पोलीस उपनिरीक्षक, हवालदारासह तीन जण जाळ्यात; पुणे विभागाची कारवाई
तडजोडीनंतर २० हजार रूपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली होती.
पहिल्या घटनेत एका भंगार विक्रेत्याने तक्रार दिली होती. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निसार मेहमूद खान (४४) यांनी तक्रारदारावर चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करून कारवाई टाळण्यासाठी आणि भंगार व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाच खासगी इसम मेहंदी अजगर शेख (वय ३२) यांनी स्वीकारली होती. त्यानंतर सापळा रचलेल्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.
दुसऱ्या घटनेत शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बाबुराव कोळेकर (५४) यांना २० हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एका व्यक्तीवर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक कोळेकर यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर २० हजार रूपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधी तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून दुपारी कोळेकर यांना शिक्रापूर येथे सापळा रचून २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू करण्यात आले.