पुणे - जिल्ह्यातील १३० गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय १३ गावांमधील पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले आहे.
पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा अहवाल
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील १३० गावात सध्या पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्ह्यातून २९१८ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये २५९ नमुने दूषित असल्याचे समोर आले.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील १३० गावात सध्या पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्ह्यातून २९१८ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये २५९ नमुने दूषित असल्याचे समोर आले. सर्वाधिक खेड तालुक्यातील १८ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. दूषित पाण्याचे नमुने आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.