महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pimpri Chinchwad Crime : 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच केले एका व्यक्तीचे अपहरण

300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. दिलीप तुकाराम खंदारे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने आरोपी मित्र प्रदीप काशीनाथ काटे याच्यासह कट रचून विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले होते. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

वाकड पोलीस
वाकड पोलीस

By

Published : Feb 1, 2022, 11:50 PM IST

Updated : Feb 2, 2022, 12:03 AM IST

पिंपरी चिंचवड -पिंपरीत कुंपनच शेत खात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. दिलीप तुकाराम खंदारे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने आरोपी मित्र प्रदीप काशीनाथ काटे याच्यासह कट रचून विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे, सुनील राम शिंदे, वसंत श्याम चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशीनाथ काटे, संजय उर्फ निकी राजेश बन्सल, शिरीष चंद्रकांत खोत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रतिक्रिया देतांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 14 जानेवारी रोजी विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण करून त्याला अलिबाग येथे डांबून ठेवण्यात आले. परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच अपहरण केलेल्या विनयला त्यांनी सोडून दिले. तेव्हाच त्यांचे अपहरण हे 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि 8 लाखांसाठी झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, दिलीप खंदारे हा पिंपरी पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. तो या अगोदर पुणे पोलीस दलातील सायबर क्राइममध्ये कार्यरत असल्याने विनय नावाच्या व्यक्तीकडे 300 कोटींचे बिट कॉईन म्हणजेच क्रिप्टो करन्सी असल्याच माहीत झाले होते. त्यामुळेच 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि 8 लाखांचा हव्यासापोटी त्यांनी अपहरण केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
Last Updated : Feb 2, 2022, 12:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details