महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण फिरणाऱ्याला पोलिसाने हटकले म्हणून तिघांनी केली मारहाण

आरोपी युनूस आत्तार हे देखील विनाकारण बाहेर फिरत असताना तक्रारदार पोलीस शिपाई यांनी त्यांना हटकले. यावरून त्यांच्याशी वाद घालून आरोपी आणि त्यांच्या दोन मुलांनी हुज्जत घालत आरोपी मतीन याने पोलिसांची काठी घेऊन आणि युनूस आत्तार आणि मोईन आत्तार याने लाथा बुक्क्यांनी पोलीस शिपायास मारहाण केली आहे.

police-beatun-up-bysome-people-in-pampri-chnchawad
पिंपरी चिंचवडमध्ये विनाकारण फिरणाऱ्याला पोलिसाने हटकले म्हणून तिघांनी केली मारहाण

By

Published : Apr 28, 2020, 12:28 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी हटकले. यावरून तिघांनी पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरातील काळेवाडी भागात घडली.

या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी दोघांना रात्री उशिरा वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. युनूस गुलाब आत्तार (वय-५०), मतीन युनूस आत्तार (वय-२८), मोईन युनूस आत्तार (वय-२४ ) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी दोघांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेप्रकरणी पोलीस शिपाई शंकर विश्वबर कळकुटे यांनी तक्रा दिली असून ते सध्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र, अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत. आरोपी युनूस आत्तार हे देखील विनाकारण बाहेर फिरत असताना तक्रारदार पोलीस शिपाई यांनी त्यांना हटकले. यावरून त्यांच्याशी वाद घालून आरोपी आणि त्यांच्या दोन मुलांनी हुज्जत घालत आरोपी मतीन याने पोलिसांची काठी घेऊन आणि युनूस आत्तार आणि मोईन आत्तार याने लाथा बुक्क्यांनी पोलीस शिपायास मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विनाकारण फिरणाऱ्याला पोलिसाने हटकले म्हणून तिघांनी केली मारहाण

संबंधित आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील मतीन आत्तार हा रेल्वे पोलिसात असून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण त्याने केली आहे. घटना पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात घडली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे या करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details