पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर व हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळावर आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू अमृतभाई मोदी यांनी भेट दिली. यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
भीमाशंकर व राजगुरू यांच्या जन्मभूमीला पंतप्रधानांच्या भावाची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू अमृतभाई मोदी यांचा पुणे जिल्ह्यातील दौरा देवदर्शन व धार्मिक स्थळांना भेटीसाठी असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू अमृतभाई मोदी यांचा पुणे जिल्ह्यातील दौरा देवदर्शन व धार्मिक स्थळांना भेटीसाठी असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी सांगितले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळासह प्राचीन मंदिरांमध्ये अगदी साधेपणाने देवदर्शन करून मोदी यांनी १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकराचे दर्शन घेतले.
देवदर्शन व धार्मिक स्थळांना भेटी देत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा न वापरता अगदी साध्या पद्धतीने हा त्यांचा दौरा नागरिकांमध्ये अगदी चर्चेचा विषय बनला होता. देशाचे पंतप्रधानांचे बंधू साधेपणाने आपल्यामध्ये येऊन मिसळून गप्पा गोष्टी करून पुढे निघून गेले. यातूनच त्यांचा मोठेपणा राजगुरूनगरकरांनी अनुभवला. यावेळी राजगुरुनगर नगरपरिषद व भाजपच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.