पुणे- एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत चाकण औद्योगिक नगरीत मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र आपण दिलेल्या संघर्षाला यश मिळाल्याने चाकणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा आरक्षण; न्यायालयाच्या निर्णयाचे चाकणला जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी
मराठा आरक्षणासाठी चाकण औद्योगिक नगरीत मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आता न्यायालयाने आरक्षण वैध ठरवल्याने नागरिकांनी मोठा जल्लोष केला.
जल्लोष करताना नागरिक
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा घटनेनुसार कायद्याच्या चौकटीत असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे चाकणमधील सकल मराठा समाजाने जोरदार स्वागत केले.
मराठा आरक्षण कायद्याला न्यायालयाने वैध ठरवल्याने नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवले. फटक्यांची आतषबाजी करत 'एक मराठा, लाख मराठा', जय जिजाऊ.. जय शिवराय.. अशा घोषणा देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
Last Updated : Jun 28, 2019, 11:15 AM IST