महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मावळमधून अजित पवारांचा मुलगा पार्थला लोकसभेची उमेदवारी?

मावळमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आज पार्थ पवार यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेतले.

By

Published : Feb 12, 2019, 12:43 PM IST

Updated : Feb 12, 2019, 3:33 PM IST

पार्थ पवार मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेताना

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मावळमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

पार्थ पवार मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेताना

आज पार्थ पवार यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेतले. पार्थ पवार मागील काही दिवसांपासून मावळ भागातील राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आज मावळमध्ये आल्यानंतर यावेळी पार्थ यांनी श्रींची मनोभावे पुजा करत अभिषेकदेखील केला. मावळमधून पार्थ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी आज घेतलेल्या बाप्पांच्या दर्शनामुळे एकप्रकारे निवडणूकीच्या प्रचाराचा श्रीगणेशाच केला असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी पार्थ यांच्यासोबत माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, युवा नेते संदीप पवार तसेच राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. मोरया देवस्थानच्यावतीने यावेळी पार्थ यांचे स्वागत करण्यात आले. मोरयांचे दर्शन घेतल्यानंतर पार्थ यांनी शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीला सुरूवात केली आहे. यावेळी पार्थ पवार यांनी मावळच्या उमेदवारीबाबत बोलण्यास नकार दिला. परंतु, मी पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून पार्थ यांनी पिंपरी चिंचवडचा दौरा सुरू केला आहे. काल राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. तर आज मोरयांचे दर्शन घेऊन नेत्यांच्या भेटीगाठीला सुरूवात केल्यामुळे त्यांची मावळची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Last Updated : Feb 12, 2019, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details