पुणे- नऊ जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने एका तरुणाला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. करण अर्जुन आहेर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला केली बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
अनिकेत चौधरी असे हल्ला करणाऱ्या सराईत टोळी प्रमुखाचे नाव असून त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
अनिकेत चौधरी असे हल्ला करणाऱ्या सराईत टोळी प्रमुखाचे नाव असून त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी अनिकेत हा त्याच्या मित्रांसह हातात कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन करणचा शोध घेत थेरगाव येथे पोहचला. येथे करणला गाठल्यानंतर नऊ जणांच्या टोळक्यातील दोघांनी त्याला बेदम मारहाण करत धमकावले.
अनिकेतच्या मित्राला धमकावले म्हणून त्याने करणला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. आरोपी अनिकेतवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, तो सध्या फरार असून त्याचा वाकड पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, वाकड पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.