पिंपरी-चिंचवड (पुणे) :शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू केले असून, दिवसेंदिवस शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात 715 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे, 341 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्णांची संख्या काही दिवस वाढतच राहील अशी प्रतिक्रिया महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर असून, एकूण 9 हजार 790 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. पैकी, 5 हजार 900 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील 211 जणांचा मृत्यू झाला आहे.