पुणे -पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीत घरकाम करणाऱ्या नेपाळी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. समर्थ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. सूरज लालसिंग सोनी (वय 26) आणि करुणा सूरज सोनी (वय 22) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहेत.
पुण्यात नेपाळी दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या - nepali couple suicide news
पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीत घरकाम करणाऱ्या नेपाळी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदमजी पार्क सोसायटीत हे दाम्पत्य राहत होते. एक वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मृत पुरुष हा वॉचमन होता तर महिला सोसायटीतच घरकाम करीत होती. त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते, असे सोसायटीतील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास दोघेही घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. सोसायटीच्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. समर्थ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.