महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Khadse : 'खडसे कधीही दगड मारु शकतात, म्हणून मी हेल्मेट घेतले'

एकनाथ खडसे ( Nationalist Congress leader Eknath Khadse ) यांच्या टीकेला राज्याचे क्रिडामंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिउत्तर ( Girish Mahajan criticism of Eknath Khadse ) दिले आहे.

Eknath Khadse
Eknath Khadse

By

Published : Nov 20, 2022, 9:16 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( Nationalist Congress leader Eknath Khadse ) यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आज टीका केली होती. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर ( Girish Mahajan criticism of Eknath Khadse ) दिलं आहे. ते म्हणाले की, खडसे साहेबांना आत्ता हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागणार आहे. ते काय बोलत आहे. काय पुढे होणार आहे.

खडसे कधीही दरड मारु शकतात

मी हेल्मेट घेतले - खडसे पर्वा ते रस्त्यावर हातात दगड घेऊन उभे होते. दगळामुळे डोकं फुटू नये म्हणून सध्या मी हेल्मेट घेतल आहे. असे महाजन म्हणाले. पुण्यात 71 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.

राज्यपालाचा केला बचाव - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केला आहे. यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन केलं जातं आहे. यावर राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. जस समजल जात आहे तसं आविर्भाव राज्यपालांचा नव्हता. तसेच सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबतीत देखील काहीही समोर आलेलं नाही.अस देखील यावेळी महाजन म्हणाले.


संजय राऊत बद्दल काही देणे-घेणे नाही - शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारने राज्यपाल यांना हटवल पाहिजे.अस म्हटल आहे. यावर महाजन यांना विचारलं असता ते म्हणाले की संजय राऊत हे काय आव्हान करतात. यांच्याशी आम्हला काहीही घेणं देणं नाही. दरोरोज ते वेगवेगळे आव्हाने करत असतात.अस देखील यावेळी महाजन म्हणाले.त सेच आम्ही राज्यपाल यांचा समर्थन करत नाही.आमच्या कोणत्याही प्रवक्त्याने तशी भूमिका देखील मांडली नाही. मागच्या वेळेस देखील आम्ही समर्थन केल नाही.अस देखील यावेळी महाजन म्हणाले

माझ्याविरोधात एकही तक्रार नाही - महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यावर महाजन यांना विचारला असता ते म्हणाले की माझ्यावर मोठ्या प्रमाणात कटकारस्थान करण्यात आल होत. पेन ड्राईव्ह बॉम्बमध्ये प्रवीण चव्हाण यांच्या सर्व बाजू समोर आल्या आहे. खडसे यांचं त्यांच्याशी वारंवार संभाषण समोर आले आहे. लवकरच सर्व गोष्ठी या समोर येणार आहे. सत्तेत असताना कशा पद्धतीने कटकारस्थान केलं जातं याच हे उत्तम उदाहरण आहे. माझ्यावर आजपर्यंत एकही तक्रार नाही. अस असताना मोक्का लावण्याचा प्रयत्न माझ्यावर करण्यात आला आहे. यात सरकारी वकील प्रवीण चव्हाण एकनाथ खडसे, काही पोलीस अधिकारी देखील होते असे, महाजन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details