पुणे- काल सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षांचा मुलगा रवी बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून बचाव कार्य सुरू होते. यात स्थानिक नागरिकांसह पोलीस जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आज सकाळच्या सुमारास त्याला सुखरूप बाहेर काढले.
बोअरवेलमध्ये पडलेला ६ वर्षांचा चिमिकला सुखरूप बाहेर, NDRF चे १६ तासांचे प्रयत्न यशस्वी
काल सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षांचा मुलगा रवी बोअरवेलमध्ये पडला होता.यात स्थानिक नागरिकांसह पोलीस जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आज सकाळच्या सुमारास त्याला सुखरूप बाहेर काढले.
मंचर नारायणगाव मार्गे थोरांदळे गावातून नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर काही मजूर काम करत होते. या मजुरांची मुले एका पडीक शेताच्या बाजूला असलेल्या बोअरवेल जवळ खेळत असताना अचानक ६ वर्षाचा रवी बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर या चिमुकल्याला वाचविण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने , एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्रभर या चिमुकल्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज सकाळच्या सुमारास या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.