महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 5, 2023, 8:06 PM IST

ETV Bharat / state

Supriya Sule On By Elections : कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांना आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची बैठक होईल तेव्हा यावर चर्चा होईल. तसेच आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे. त्यांनी मागणी केली की, आम्ही त्याबाबत विचार करू असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

Supriya Sule On By Elections
सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना

पुणे:सासवड येथे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

मेधा कुलकर्णीवरील अन्यायाविरुद्ध सुप्रिया बोलल्या : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारी नंतर भाजपने ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने तसेच आमदार मुक्ता टिळक यांच्या पती शैलेश टिळक यांना उमेदवारी न दिल्याने नाराजी दर्शविली होती. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मेधा कुलकर्णी यांना एका समाजाची नाही तर एक कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे बघते. त्यांचे टिकीट कापण्यात आले तेव्हा वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटले की समतेची भाषा होते, महिला आरक्षणावर बोलले जाते तेव्हा एका कर्तृत्ववान महिलेवर अन्याय होतो. मेरिटच्या गोष्टी केंद्र सरकारमधील भाजपच्या मंत्री सातत्याने बोलतात. यासह परिवारवादाच्या गोष्टी सातत्याने ते बोलत असतात.

शैलेश टिळक यांची खंत :दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे लागलेल्या कसबा पोट निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हेमंत रासने यांना तिकीट दिले. त्यानंतर आता नाराजी समोर येताना दिसत आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नावसुद्धा यामध्ये प्रमुख दावेदार म्हणून घेतले जात होते. परंतु कसबातून भाजपाने तिकीट दिले नाही, याची खंत आहे नाराजी नाही. अशी प्रतिक्रिया आता शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.

खंत आहे, नाराजी नाही : टिळक कुटुंबियांमध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिली पाहिजे, अशी अपेक्षा होती. पण उमेदवारी दिली गेली नाही, त्यानंतर आता या प्रतिक्रिया येत आहेत. कुणाल टिळक यांची प्रवक्ते पदी निवड झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांची समजूत काढली होती. शनिवारी पक्षाने तिकीट दिले. परंतु पक्षाने आपल्याला तिकीट द्यावे, अशी अपेक्षा असताना ती अपेक्षा पूर्ण झाली नाही, अशी भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली आहे.

रासने यांना भाजपची उमेदवारी : दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी शनिवारी मुक्ता टिळक यांचे दर्शन घेतले. त्यांना अभिवादन केले. टिळक कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. शैलेश टिळक यांचे अभिनंदन केलेले आहे. मुक्ताताई आणि मी एकाच पक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. आमचे कौटुंबिक नाते आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे कुटुंब आहे. त्यामुळे पक्षाने दिलेला हा निर्णय आहे, त्याचे स्वागत शैलेश टिळक यांनी केली आहे, अशी भावना उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत नाराजीची चर्चा दिसत आहे.

हेही वाचा :Sanjay Raut on BJP : राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली? खासदार संजय राऊत यांचा भाजपला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details