महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : कारेगावमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

वायरमन लखीचंद राठोड यांनी सोमवारी (काल) मारहाण करणाऱ्यांना थकीत लाइट बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करावे लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर सर्विस वायर व लाइट बिल भरण्याच्या रागातून प्रताप कातोरे, अमोल कातोरे, हर्षद धुमाळ, श्यामराव धुमाळ यांनी राठोड यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

By

Published : Jun 22, 2021, 8:32 PM IST

Updated : Jun 23, 2021, 6:42 AM IST

पुणे -जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पाच जणांनी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला (वायरमन) राहत्या घरात घुसून जबर मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वायरमन लखीचंद राठोड यांनी सोमवारी (काल) मारहाण करणाऱ्यांना थकीत लाइट बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन कट करावे लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर सर्विस वायर व लाइट बिल भरण्याच्या रागातून प्रताप कातोरे, अमोल कातोरे, हर्षद धुमाळ, श्यामराव धुमाळ यांनी राठोड यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या मारहाणीत राठोड यांना गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर तीन जणांना अटक केली असून उर्वरित दोन मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
Last Updated : Jun 23, 2021, 6:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details