महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya Sule Helped Passengers: बंद पडलेल्या शिवशाही बसमधील प्रवाश्यांसाठी सुप्रिया सुळे ठरल्या देवदूत

खासदार सुप्रिया सुळे आज (शनिवारी) भोर तालुक्यातील एका कार्यक्रमाला जात असताना कात्रज घाटात शिवशाही गाडी बंद पडलेली दिसली. दरम्यान त्यांनी स्वत: कारमधून उतरून प्रवाश्यांची नियोजित स्थळी जाण्याची व्यवस्था करून दिली. त्यांचा हा समाजभाव बघून प्रवाशी भारावून गेले.

Supriya Sule Helped Passengers
सुप्रिया सुळे

By

Published : May 27, 2023, 7:26 PM IST

अडचणीत अडकलेल्या प्रवाश्यांना खा. सुप्रिया सुळेंची मदत

पुणे:गाडीतील महिला प्रवाशांनी सुप्रिया सुळे यांची गाडी येताना पाहून ती थांबविली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या गाडीत लहान मुले, महिला आणि वृद्धांना भोरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. त्या स्वतः गाडीतून उतरल्या आणि येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून त्यांना प्रवाशांना सोडण्याची विनंती केली. वाहनचालकांनीही त्यांच्या विनंतीचा मान राखून प्रवाश्यांना आपल्या वाहनात बसविले.


प्रवाश्यांकडून कौतुक:खासदार सुप्रिया सुळे यांनी कुणाला भोरपर्यंत तर कुणाला खेड शिवापूरपर्यंत सोडण्याची व्यवस्था केल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. एवढ्या मोठ्या राजकीय नेत्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून गाड्यांना हात दाखवून सर्वसामान्य लोकांप्रमाणे विनंती केली. संकटात सापडलेल्या प्रवाश्यांची अडचण दूर केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समाजसेवेचे उदाहरण केले सादर:सुप्रिया सुळे यांनी दाखविलेला साधेपणा आणि प्रवाशांबद्दलची आपुलकी पाहता सर्वच आश्चर्यचकित झाले. काही चारचाकी गाड्यांनासुद्धा हात दाखवून त्यांनी प्रवाशांना नियोजित स्थळी सोडण्याची विनंती केली. तसेच एका एसटी बसलासुद्धा हात केला. ही एसटी बस सांगलीला जाणार होती. परंतु, खाली थांबलेले प्रवासी भोरचे असल्याने त्यांना शिवापूर टोलनाक्यापर्यंत तरी सोडा, अशा सूचना सुप्रिया सुळेंनी दोन्ही चालक वाहकांना केल्या. सर्व प्रवासी जाईपर्यंत कात्रज घाटामध्ये स्वतः थांबून त्यांनी सामाजिक कर्तव्य बजावले. राजकीय पक्षाचा नेता हा सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये मदत करणारा असला पाहिजे, याचे उदाहरण त्यांनी यातून घालून दिले. प्रवाशांनीही सुप्रिया सुळेंचे आभार मानून तेथून निरोप घेतला.

शेतकऱ्यांच्या मदतीची सरकारकडे याचना: एप्रिल महिन्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकळ घातला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे होते. सरकार पंचनामे करून मदत देतो अशी घोषणा करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. याविषयी सरकार असंवेदनशील असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे पवार यांनी आज केली आहे.

तर हे झालेच नसते: सुप्रिया सुळे यांनी आज कात्रज भागामध्ये विकास कामाची पाहणी केली. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सरकारकडून आणखी काही अपेक्षा नाही, नाशिकच्या आदिवासी आणि शेतकऱ्यांनासुद्धा मोर्चा काढत पायपीट करत यावे लागले. अगोदरच त्यांच्या समस्या सोडवल्यास त्यांनी त्यांना हवा तो भाव दिला असता, तर हे झालेच नसते; पण सरकार ते पोहोचेपर्यंत वाट बघतील. त्यामुळे हे सरकार किती शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील आहे, हे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेणे गरजेचे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details