पुणे: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील लोकांकडून राऊत यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. शिवसेनेचे माजी नेते तसेच सध्या शिंदे घटना सामील झालेले खासदार गजानन किर्तीकर (Shiv Sena leader and MP Gajanan Kirtikar) यांनादेखील राऊत यांच्या वाढदिवसाविषयी विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना तीन वेळा शुभेच्छांसाठी फोन केले. पण त्यांनी फोन उचलले नाहीत, आता मेसेज करतो, असे यावेळी किर्तीकर (MP Gajanan Kirtikar in Pune) म्हणाले.
स्वागत आणि सत्कार :शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांचा पुणे येथे युवा सेनेच्या वतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आले. हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्व विचारांना पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड येथील कीर्तिकर यांच्या निवासस्थानी युवा सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत (Gajanan Kirtikar felicitated by Yuva Sena in Pune) होते.
शिवसेना कमकुवत :यावेळी किर्तीकर म्हणाले की, मी आता 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो आहे. माझे जाण्याचे कारण मी सांगितले आहे. राष्ट्रवादी बरोबर प्रवास आपल्याला येणाऱ्या काळात धोकादायक ठरणार आहे. याच कारणामुळे आम्ही शिवसेना सोडली आहे. मुख्यमंत्री आमचे होते, महाराष्ट्रातील आमच्या इतर आमदार आणि पदाधिकारी यांना कोणीही जुमानत नव्हते. याच्या उलट राष्ट्रवादीला सगळी ताकद मिळत होती. त्यांना सगळे मिळत होते. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आम्हाला कळत होते. हा आवाज आम्ही उद्धव साहेबाना सांगत होतो. शिंदे गेल्यानंतर आम्हा खासदारची बैठक घेतली. त्यावेळेस आम्ही सांगितले होते, राष्ट्रवादी सोबतची साथ सोडा, काँग्रेसचे काही होत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना कमकुवत होत आहे. असे देखील यावेळी किर्तीकर (MP Gajanan Kirtikar in Pune) म्हणाले.