पुणे - कुस्ती क्षेत्रातील मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ( Maharashtra Kesari Wrestling Tournament ) 14 डिसेंबरला पुण्यात होणार आहे. पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठानकडून महाराष्ट्र केसरीचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी महापौर मुरलीधर मोहोळ ( ex Mayor Muralidhar Mohol ) यांच्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले महाराष्ट्र केसरी मानाची गदा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांची उपस्थिती राहणार आहे. त्यासह कुस्ती परिषदेचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) हे देखील उपस्थित राहणार आहेत.
राज ठाकरे आणि खासदार बृजभूषण सिंह वादभाजपचे खासदार आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांना आयोध्या दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांनी उत्तरभारतीय नागरिकांची माफी मागण्याची अट घातली होती. त्यावरुन मोठा वाद उफाळला होता. त्यातच राज ठाकरे यांचा दौराही प्रकृतीच्या कारणामुळे रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळेस बृजभूषण सिंह यांच्याकडून अतिशय स्फोटक वक्तव्य ते करत होते. त्यावेळेस प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्रात येणार आहेत. आणि त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होत आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लागले लक्षकुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) हे पुण्यात येत आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Maharashtra Navnirman Sena ) काही भूमिका घेणार आहे का याकडे मनागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांच्या आदेशावरुन कार्यकर्ते त्यांचे कसे स्वागत करतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadnavis ) यांची अनेक कार्यक्रमात एकत्र भेट होत आहे. त्यांची जवळीक वाढलेल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे. त्यामुळे या जवळीक वाढल्यामुळे राज ठाकरे खासदार बृजभूषण सिंह यांना विरोध करणार का? नाही याबाबत साशंकता आहे.
14 डिसेंबरला रंगणार महाराष्ट्र केसरीचा सामनासंस्कृती प्रतिष्ठानला यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे. पुण्यात या स्पर्धा 10 जानेवारीपासून सुरु होणार असून 14 तारखेला अंतिम विजेत्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadnavis ) आणि खासदार बृजभूषण सिंह ( MP Brijbhushan Singh ) यांच्या प्रमुख उपस्थित मानाची महाराष्ट्र केसरी गदा देण्यात येणार आहे.