पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील 40 मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला ( PMPL Passengers in Problem ) आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण आणि जागेची असलेली अडचण लक्षात घेता पुण्यामध्ये काम करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अनेक लोक येतात. त्यांना येजा करण्यासाठी ही महत्वाची व्यवस्था आहे ते म्हणजे पीएमपीएल बस. आता त्या बस ग्रामीण भागांमधून बंद करण्याचा निर्णय पीएमपीएलने घेतलेला आहे.
पीएमपी तोट्यात :पुणे आणि पिंपरी चिंचवडहद्दीत पीएमपीकडून 1290 बस चालवण्यात येतात. शहराबाहेर पीएमपीचे 104 मार्ग सुरू आहेत. दररोज दहा ते बारा लाख प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. शहरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता ही सेवा अपूरी पडत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून आहे. तसेच ग्रामीण भागात पीएमपी तोट्यात चालली ( PMP at loss ) होती. हे देखील या मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण आहे.