पुणे : सीमा प्रश्नावर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातला वाद ( Dispute between Karnataka and Maharashtra state ) चिघळला आहे. पुण्यामध्ये रात्रीच्या वेळी कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना नवले ब्रिज येथे मनसे सैनिकांनी काळ फासत आंदोलन केलेला आहे. पुण्यात बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या (Balasaheb Uddhav Thackeray ) शिवसेनेनेसुद्धा आंदोलन केले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळेस मनसेच्यावतीने अचानक हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली ( police were also shocked ) होती. तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे.
Karnataka Dispute : मनसेकडून कर्नाटकच्या खासगी बसला काळे फासून आंदोलन
पुण्यामध्ये रात्रीच्या वेळी कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना नवले ब्रिज येथे मनसे सैनिकांनी काळ फासत आंदोलन केलेला आहे. रात्रीच्या वेळेस मनसेच्यावतीने अचानक हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली ( police were also shocked ) होती. तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे.
माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा : राज्यामध्ये सीमा वादावरून सर्वच राजकीय पक्षाकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन सीमावरती भागात मराठी बांधावर अन्याय होताना गप्प बसलेला आहे. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशाराच मनसेने दिलेला आहे. त्याच्याच प्रतिक्रिया म्हणून नवले ब्रिज हवेवरती कर्नाटकामध्ये जाणाऱ्या गाड्या अडून त्यांना मनसेच्यावतीने काळ फासण्यात आलेला आहे. त्या गाड्यावर मनसे असे लिहिण्यात आलेल्या. यावेळी जोरदार घोषणा सुद्धा देण्यात आले आहेत. मनसे नेते शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
मनसेही कर्नाटकाच्या विरोधात आक्रमक :महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद थांबताना दिसत नाही. कन्नड वेदिकाच्या कार्यकर्त्याने कर्नाटकामध्ये महाराष्ट्राचे नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांना टार्गेट केले होते. त्या ठिकाणच्या गाड्या फोडण्यात आलेल्या होत्या त्यानंतर त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर मनसेही कर्नाटकाच्या विरोधात आक्रमक झालेली दिसून येत आहे.