महाराष्ट्र

maharashtra

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे - पडळकर

सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मोठा घोळ झाला आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

By

Published : Mar 13, 2021, 3:34 PM IST

Published : Mar 13, 2021, 3:34 PM IST

Updated : Mar 13, 2021, 4:25 PM IST

पुणे
पुणे

पुणे- युती सरकारच्या काळात एमपीएससीची सर्वात मोठी भरती झाली होती. मात्र, सध्याचे आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना अजूनही या निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देता आलेली नाही. या सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मोठा घोळ झाला आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पुणे

खंडपीठाने सांगून देखील हे सरकार नियुक्तीपत्रे देत नाही. महाराष्ट्रातील गोर-गरिबांची मुले यामध्ये आहेत, त्या मुलांना ताबडतोब नियुक्ती द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे पडळकर म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. या मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आपल्या मागणीसाठी आपली बाजू मांडण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यात एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारने पोलिसांचा दबाव आणून त्यांना त्यांची भूमिका मांडू दिली नाही, हे सरकार दडपशाही करत असल्याचे पडळकर म्हणाले.

सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये

आज पुण्यामध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार एकत्र येणार होते, त्यांना भेटण्यासाठी पडळकर पुण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे परवाचे आंदोलन देखील पोलिसांनी मोडीत काढले, सरकारला पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये. विभागांमध्ये कर्मचारी कमी असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र नियुक्तीपत्र द्यायला काय अडचण आहे, हे विद्यार्थी भावी अधिकारी आहेत, महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांचे भविष्य वाया घालवू नका, सरकारने लवकरात लवकर नियुक्त्या दिल्या नाहीत, तर या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत आंदोलन करू, असे गोपीचंद पडळकर यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा -भंडाऱ्यातील प्रेमीयुगुलाची वैनगंगेत आत्महत्या; प्रेमाला विरोध असल्याने उचलले पाऊल?

हेही वाचा -धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री

Last Updated : Mar 13, 2021, 4:25 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details