पुणे - सध्या आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. मात्र, अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे दिवसरात्र कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांकडेच सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी केला.
धक्कादायक..! कोरोना विरुद्ध दोन हात करणारे आरोग्य कर्मचारी पगाराविनाच
पुणे जिल्हा परिषदेचे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. मात्र, अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे पगार झालेले नाहीत.
वेतन न मिळाल्याने आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना या महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे असा प्रश्न पडला आहे. 14 तारीख उलटून गेली तरीही जिल्हा परिषदेकडून अद्यापही वेतन दिले गेले नाही. कुटुंबाचा खर्च कसा भागवावा याचा पेच या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासमोर पडला आहे. हे कर्मचारी तक्रार न करता कोरोनाशी दोन हात करुन लढत आहेत.
कोरोनाच्या लढ्यात आरोग्य कर्मचारी हे महत्त्त्वाचे शिलेदार आहेत. त्यांच्या सेवा, समर्पन आणि त्यागाचा सरकारने सन्मान करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याच पगाराला होत असलेला विलंब पाहून प्रशासनाचे या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील म्हणाले.