महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंचर ग्रामपंचायतीचे कडक धोरण, बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर

मंचर ग्रामपंचायतीने पुणे, मुंबई या शहरातून व इतर भागातून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने क्वारंटाईन करण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विलिगीकरण कक्ष तयार केला आहे.

Manchar Gram Panchayat
मंचर ग्रामपंचायतीने उभारले क्वारंटाईन सेंटर

By

Published : May 15, 2020, 5:46 PM IST

पुणे - राजगुरुनगर शहरात कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मंचर ग्रामपंचायतीने पुणे, मुंबई या शहरातून व इतर भागातून येणाऱ्या नागरिकांना सक्तीने क्वारंटाईन करण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विलिगीकरण कक्ष तयार करुन एका व्यक्तीला सर्व गरजेच्या वस्तू देऊन बेड तयार केले आहेत.

मंचर ग्रामपंचायतीने उभारले क्वारंटाईन सेंटर


पुणे जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी मंचर शहरात पहिल्या दिवसापासून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोरोना आता दाराजवळ येऊ लागल्याने विनापरवानगी बाहेरगावावरुन येणाऱ्यांना आता क्वारंटाईन करुन विलिगीकरण केले जाणार आहे. नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे सरपंच दत्ता गांजळे यांनी सांगितले.

मंचर ग्रामपंचायतीने उभारले क्वारंटाईन सेंटर
क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांना मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विलिगीकरण कक्ष तयार करुन एका व्यक्तीला अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आतापासूनच उपलब्ध केल्या आहेत. कोरोनाचा समूहसंसर्ग झाला तर मोठ्या संख्येने नागरिकांना क्वारंटाईन करण्याची वेळ येईल, त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मंचर ग्रामपंचायतीने तत्काळ एक पाऊल पुढे टाकले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details