महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यावर्षी 33 कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

यावर्षी राज्यामध्ये वनविभागाच्या वतीने तब्बल 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 4, 2019, 1:34 PM IST

पुणे - दरवर्षी 1 जुलैपासून विविध सरकारी कार्यालयांमार्फत वृक्षारोपण केले जाते. त्यासोबतच वृक्षारोपणाचे लक्ष्यदेखील निर्धारित केले जाते. यावर्षी राज्यामध्ये वनविभागाच्या वतीने तब्बल 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

पत्रकारपरिषदेला संबोधतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
यासंदर्भात पुणे येथे विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यात ते म्हणाले, राज्यात यंदा वनविभागाच्या वतीने 33 कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यात 24.14 कोटी वृक्षारोपण करण्यात आले. तर वृक्ष जगण्याचे प्रमाण 86 टक्के आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत 5 कोटी 47 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. तसेच मनपाने डीपी प्लान बरोबर टीपी प्लान करण्याचेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले. या बैठकीला मुनगंटीवार यांच्यासह खासदार गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळेंसह अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूरमध्ये अधिक झाडे लावली त्याची गरज नाही, असे भाजप नेत्या शोभा फडणवीस यांनी म्हटले होते. यावर वन आणि धनाला मर्यादा नसते. ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details