पुणे - राज्य सरकारने राज्यात ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही विक्री फक्त नॉन कंटेन्मेंट भागातच होणार आहे. कंटेन्मेंट भागात दारूची कोणतीही विक्री होणार नाही. तसे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढले असून ग्राहकांना दारू राज्य सरकारने दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन परवानगी मिळवावी लागणार आहे. येत्या १५ तारखेपासून ही सेवा मिळणार आहे.
पुणेकरांना १५ मेपासून घरपोच दारू मिळणार, पण...
पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता घरपोच दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना राज्य सरकारने दिलेल्या वेबसाईटवरून ही दारू मागवावी लागणार आहे.
आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या दुकानदारांना ही विक्री करता येणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेऊन डिलिव्हरी बॉय ही सेवा देणार आहेत. मात्र, डिलिव्हरी बॉयने मास्क आणि इतर सुरक्षेच्या साधनांचा वापर केला नाही तर परवानाही रद्द केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिली.
येत्या 15 तारखेपासून ग्राहकांना घरपोहोच दारू मिळणार आहे. महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या वेळेनुसारच दुकानदारांना दुकाने सुरू करता येतील. 10 पेक्षाजास्त डिलिव्हरी बॉय एका दुकानदाराला ठेवता येणार नाही, अशी माहिती प्रसाद सुर्वे यांनी दिली.