पुणे -जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज(शुक्रवार) दुपारी समोर आली आहे. स्थानिक नागरिक व वनविभागाच्या मदतीने या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
शिकारीच्या शोधात भटकंती करताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना विहिरीला कठडा नसल्याने हा बिबट विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विहिरीच्या परिसरात बिबट्याच्या मृत्यूमुळे दुर्गंधी पसरल्याने ही घटना समोर आली.
हेही वाचा -..तर सोसायटी धारकांना कोरोना झाल्यास कोण जबाबदार?
सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याच्या वास्तव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात असणाऱ्या विहिरींना कठडे नसल्याने बिबट शिकारीच्या मागे धावत असताना विहिरीत पडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याच्या संगोपनासाठी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा -COVID19 : 'पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनासाठी खबरदारीचा नवा प्लॅन आखणार'