महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कडुस येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

By

Published : May 7, 2019, 12:13 PM IST

बिबट्याने फडशा पाडलेला कुत्रा

पुणे- गेल्या अनेक दिवसापासून खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारासदेखील कडुस येथील आगारमाथा वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजगुरुनगरचा वनविभाग

बिबट्याचा खेड तालुक्यातील वावर वाढल्याने नागरिकांसह चिमुकली मुले आणि पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी बिबट्याने सातकरस्थळ येथे पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. तसेच त्याचा सांगाडा झाडावर ठेवला होता. तेव्हापासून परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून वनविभाग कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details