महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामान्य नागरिकांसाठी दिवस-रात्र झटणारे संयमी, अभ्यासु नेतृत्व हरपले - वळसे पाटील

खेडचे माजी आमदार सुरेश गोरेंना मागील दीड महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर चाकण व पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

By

Published : Oct 10, 2020, 3:30 PM IST

सुरेश गोरें
सुरेश गोरें

राजगुरूनगर (पुणे) - गेल्या पंचवीस वर्षांपासून जनतेत राहून सामान्य नागरिकांसाठी दिवसरात्र झटणारे शांत, संयमी, अभ्यासू नेतृत्व असणारे माजी आमदार सुरेश गोरेंचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

बोलताना कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील
खेडचे माजी आमदार सुरेश गोरेंना मागील दीड महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर चाकण व पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जनसामान्य नागरिकांना कोरोनाच्या संकट काळात त्यांनी गावा-गावात जाऊन प्रत्येकाला मदतीचा हात दिला. कोविड केंद्र उभारणीपासून ते रुग्णांना योग्य उपचार मिळेपर्यंत अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी काम पाहिले. त्यातच गोरेंनाही कोरोनाची लागण झाली आणि आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. माजी आमदार सुरेश गोरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना जिल्ह्यात योग्य नियोजनातून चांगली कामे मार्गी लावली. जिल्ह्यात त्यांचे सयंमी नेतृत्व प्रसिद्ध झाले होते. एक चांगला सहकारी आज आपल्यातून निघून गेल्याने पुणे जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना वळसे-पाटलांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details