पुणे -जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर कांचनजुंगा - ( उंची 8586 मीटर -28,169 फूट ) हे पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी बुधवारी सकाळी सर केले. एकूण 10 जणांनी सकाळी साडेपाचच्या सुमारास हे शिखर सर केले. गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांनी केलेल्या या चढाईनंतर पुण्यातल्या गिरिप्रेमीच्या कार्यालयांमध्ये मोठा जल्लोष केला. मोहिमेवर गेलेल्या गिर्यारोहकांच्या कुटुंबीयांनी आणि गिरिप्रेमीच्या पुण्यातील सदस्यांनी एकत्र येत या यशस्वी मोहिमेचा जल्लोष केला.
कांचनजुंगा शिखर सर करणाऱ्या 'गिरीप्रेमी'च्या कुटुंबीयांचा पुण्यात जल्लोष
सुरवातीचे ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर ११ मे ला बेस कॅम्पवरून कांचनजु्गाची चढाई सुरु केली. १४ मे'ला सांयकाळी ५ वाजता कॅम्प फोर त्यानी सोडला होता. १५ तारखेला पहाटे ५.३० च्या दरम्यान सगळ्यांनी हे समिट केले. संपूर्ण मोहीम गिरीप्रेमीच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली पार पडली. याचा जल्लोष पुण्यातील सदस्यांनी केला.
सुरवातीचे ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर ११ मे ला बेस कॅम्पवरून कांचनजु्गाची चढाई सुरु केली. १४ मे'ला सांयकाळी ५ वाजता कॅम्प फोर त्यानी सोडला होता. १५ तारखेला पहाटे ५.३० च्या दरम्यान सगळ्यांनी हे समिट केले. संपूर्ण मोहीम गिरीप्रेमीच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली पार पडली. कांचनजुंगा सर करणारे 10 गिर्यारोहक पुणेकर आहेत. कांचनजुंगा हे नेपाळ -भारत सीमेवर सिक्कीम जवळ ( दार्जिलिंगच्या समोर ) आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर 'कांचनजुंगा', ज्याची उंची 8586 मीटर म्हणजेच 28,169 फूट एवढी आहे. हे शिखर सर करण्याचा मान पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी मिळवला आहे.
या संस्थेच्या तब्बल 10 गिर्यारोहकांनी सकाळी 5.30 च्या सुमारास कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवले आहे. 1977 च्या यशस्वी ठरलेल्या लष्करी मोहिमेनंतरची ही देशातील पहिली नागरी मोहीम असल्याचे मानण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या गिर्यारोहकांच्या संख्येने कांचनजुंगा शिखर सर करण्याची जगातील ही पहिलीच मोहीम ठरली आहे. अवघड मार्ग आणि त्यापेक्षा अत्यंत बेभरवशाचे आणि सतत बदलणारे वातावरण यामुळे हे शिखर सर करणे अवघड मानले जाते. जगातील 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेली एकूण 14 हिमशिखरे आहेत. त्यापैकी एक कांचनजुंगा हे शिखर आहे. यामुळे हे शिखर सर करणे हा एक बहुमान समजला जातो. गिरीप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर व जितेंद्र गवारे यांनी ही यशस्वी शिखर चढाई केली.