महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vasant More : मी मनसे सोडणार नाही; अजित पवारांच्या ऑफरवर वसंत मोरेंचे स्पष्टीकरण

वसंत मोरे यांना अजित दादांकडून खुली ऑफर देण्यात आली ( Ajit Pawar offer Vasant More To Join NCP ) आहे. एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली होती. तेव्हापासून या चर्चांना उधाण आले होते.

By

Published : Dec 5, 2022, 2:03 PM IST

Vasant More
वसंत मोरे

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे काही ना काही कारणाने नेहेमीच चर्चेत असतात. आत्ता मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून पक्षाची ऑफर आल्याने पुन्हा एकदा तात्या राष्ट्रवादीच्या वाटेला आल्याच्या चर्चेला उधाण आले ( Ajit Pawar offer Vasant More To Join NCP ) आहे.

राष्ट्रवादीत येण्याची ऑफर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली ( Offer To Vasant More From NCP ) आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट ( Ajit Pawar And Vasant More Meeting ) झाली. त्यावेळी अजितदादांनी वसंत मोरे यांच्याशी हस्तांदोलन करत तात्या कधी येताय वाट पाहतोय असे म्हणत वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. या प्रसंगाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली ( Vasant More Joing NCP ) आहे. वसंत मोरे यांनीही आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्याचे मान्य केले. पण मी मनसे पक्ष सोडणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केल ( I will not leave MNS Vasant More explanation ) आहे. पुणे महानगरपालिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर वसंत मोरे हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शहरात मनसेला खिंडार :पुण्यात वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा असतानाच दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली होती. निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.आणि आज याच माथाडी कामगार सेनेतील तब्बल 400 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने शहरात मनसेला खिंडार पडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details