शिक्रापूर (पुणे) - शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे किरकोळ करणातून एका इसमाने पत्नी व मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत नाथराव फड या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वढू बुद्रुकमध्ये किरकोळ कारणातून पत्नी व मुलाला मारहाण, गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे किरकोळ करणातून एका इसमाने पत्नी व मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
'तुम्ही मुलाला काठीने का मारता?'
वढू बुद्रुक येथील लता फड ही महिला २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी आलेली असताना त्यांचे पती मुलाला काठीने मारत होते. त्यामुळे मुलगा घरात लपल्याने लता फड यांनी पतीला तुम्ही मुलाला काठीने का मारता असे विचारले असता पतीने लगेचच हातातील काठीने पत्नीला बेदम मारहाण करत जखमी केले. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये लता फड या जखमी झाल्या. याबाबत लता हनुमंत फड (वय ४२ वर्षे, रा. वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हनुमंत नाथराव फड (वय ४६ वर्षे, रा. वढू बुद्रुक, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे हे करत आहे.