महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विहिरीत मानवी हाडांचे अवशेष सापडल्याने परिसरात खळबळ

केसनंद गावचे पोलिस पाटील पंडीत हरगुडे यांनी एका विहिरीत गाठोडे सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यामध्ये मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे सापडले.

मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे सापडले

By

Published : Jun 19, 2019, 6:54 PM IST

पुणे - केसनंद-थेऊर रस्त्यावरील एका विहिरीत मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे अवशेष एका महिलेचे असण्याचा अंदाज आहे.

केसनंद-थेऊर रस्त्यावरील एका विहिरीत मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे सापडले


मानवी हाडांच्या अवशेषाचे गाठोडे लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत केसनंद गावाजवळील एका विहिरीत सापडले. केसनंद गावचे पोलिस पाटील पंडीत हरगुडे यांनी एका विहिरीत हे गाठोडे सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यात विहिरीतील एका कोपऱ्यात दगड बांधलेले गाठोडे सापडले. ते बाहेर काढून पाहणी केली असता त्यामध्ये मानवी हाडांचा सांगाडा सापडला. सोबतच मंगळसूत्र आणि बांगड्याही आढळल्या. हे अवशेष पाहता या घटनेला एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला असावा. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details