महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2023, 4:29 PM IST

Updated : Mar 10, 2023, 8:11 AM IST

ETV Bharat / state

Shivjayanti : म्हणून तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात - इतिहास अभ्यासक पांडुरंग

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी शासनाच्या नुसार शिवजयंती साजरी केली जाते. काही शिवभक्तांकडून तिथीनुसार देखील शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीच्या मुद्द्यावरून इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्यासबोत बातचीत.

History scholar Pandurang
इतिहास अभ्यासक पांडुरंग

काही लोक 19 फेब्रुवारी तर काही लोक तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात

पुणे :काही लोक 19 फेब्रुवारी तर काही लोक तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. याबाबत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आहे. त्यावेळेस साल गणना ही हिंदू पद्धतीनुसार सुरू होती. त्या नुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया फाल्गुन शके यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. यानुसार काही लोक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात. तर काही मंडळी तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात.



म्हणून तिथी नुसार : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासनाकडून एकावेळी साजरी केली जाते. तर लोकांकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. यामागील भावना काय आहे. काही शिवभक्तांची अशी भावना आहे की, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केली. त्या शिवाजी महाराज यांना वाटत होत की, जरी परकीय सालगणना असल्या तरी देशाची सलगणना सुरू व्हावी. त्यांनी शालीवन शाखेची सुरूवात केली. तिथीला महत्त्व दिले. परकियांची संस्कृती जी येथे लादण्याचा प्रयत्न झाला होता. ते नाकारून प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधित्व केले. तसेच महाराजांनी भाषा शुद्धी देखील केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या संस्कृतीच संवर्धन केले आणि ज्या संस्कृतीला विरोध केला म्हणून, आज काही शिवभक्तांकडून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली जाते.


शासन तारखेनुसार शिवजयंती: दोन दोन शिवजयंती साजरी करायला कोणताही वाद नाही. शासनाकडून जी शिवजयंती साजरी केली जाते त्यामागे शासनाची भूमिका अशी आहे. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. कारण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला दरवषी तारीख ही बदलली जाते. म्हणून शासन तारखेनुसार शिवजयंती साजरी करत असते.


काय प्रेरणा घ्यावी? : राज्यात तसेच देशात आज जी काही परिस्थिती आहे. त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज काय महत्त्व आहे. याबाबत सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी भ्रष्टाचार मुक्त समाज केला. तसेच महिलांचे रक्षण करणारे राज्य त्यांनी स्थापन केले. महिलांना प्रतिष्ठा निर्माण करून दिली. मानवतेचा कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केले. त्यांनी रयतेच्या राज्यात प्रत्येकाचा विचार केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची देवांविषयी श्रद्धा होती अंधश्रद्धा नव्हती. तसेच महाराजांनी विज्ञानवादी समाज आणि भयमुक्त समाज निर्माण केला होता. या सर्व बाबी पाहता आजही शिवाजी महाराज यांचे महत्त्व आणि त्यांच्याकडून तरुणांनी या गोष्टींची प्रेरणा घ्यावी असे यावेळी बलकवडे यांनी सांगितले.


हेही वाचा : Tukaram Beej 2023 देहूत जगतगुरु तुकोबांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा लाखो वारकरी देहूत दाखल

Last Updated : Mar 10, 2023, 8:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details