पुणे- उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात मागील 24 तासापासून पावसाचा जोर वाढला आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील नद्या आणि भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.
भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला; उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने कुकडी प्रकल्पातील नद्या आणि भीमा, भामा, इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
राजगुरुनगर शहरालगत भीमा नदी काठावर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म वाडा असून त्याच्याच बाजूला राम मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे राजगुरूंच्या जन्म वाड्याला पाणी लागले आहे. भीमेचे हे रौद्र रूप पाहण्यासाठी राजगुरुनगर शहरातील नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, नदीकाठावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुकडी प्रकल्पातील नद्या व भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत. पावसाची संततधार अजूनही सुरू राहिली तर नदीपात्रात यापेक्षाही जास्त पाणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.