पुणे- येथे सर्पमित्रांनी घोणस जातीच्या नर आणि मादी सापांना जीवदान दिल्याचे समोर आले आहे. मावळ मधील एका शेतकऱ्याच्या विहिरीत घोणस साप पडले होते. सर्प मित्रांना याची माहिती मिळताच तातडीने ते संबंधित विहिरीच्या ठिकाणी गेले आणि तेथून त्यांनी घोणस जातींच्या सापांना बाहेर काढले आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले आहे. हे साप गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विहीरीत पडले होते. ते भक्ष्याच्या शोधात असावेत असे सर्पमित्रांनी सांगितले.
सर्पमित्रांनी घोणस नर-मादीला दिले जीवदान ; 12 दिवसांपासून होते विहिरीत - देहू
मावळमधील देहू माळवाडी गावातील शेतकरी सुभाष परंडवाल यांच्या शेतालगत दोन घोणस जातीचे साप शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत गेली दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पडले होते.
मावळमधील देहू माळवाडी गावातील शेतकरी सुभाष परंडवाल यांच्या शेतालगत दोन घोणस जातीचे साप शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत गेली दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पडले होते. ही माहिती सर्पमित्र नयन कदम, निनाद काकडे, रितेश साठे, सूरज शिंदे व रोहन ओव्हाळ यांना शेतकऱ्याने दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ येऊन दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मोठ्या शिताफीने सापांना बाहेर काढले. त्यांना अनेक तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही घोणस जातीचे साप सुमारे चार फूट लांबीचे नर व मादी होते. सर्प मित्रांनी जीवदान देत जंगलात सोडून देण्यात आले.