महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..राहिलेल्यांची उमेदवारी पवार जाहीर करतील; बापटांचा अजित पवारांवर टोला

आमची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील ते तिकडे जातील. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष उमेदवारी जाहीर करेल, असा टोला गिरीश बापटांनी अजित पवारांना लगावला आहे.

संपादीत छायाचित्र

By

Published : Sep 24, 2019, 6:41 PM IST

Updated : Oct 3, 2019, 5:11 PM IST

पुणे- अजित पवार यांनी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या काही जागा जाहीर केल्यानंतर तेथील उमेदवारांची नावे जाहीर करणार आहोत, अशी भूमिका घेतली आहे. यावर खासदार गिरीश बापट यांनी टोला लगावत आम्ही कोणाची वाट पाहणार नाही. आमची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील ते तिकडे जातील तेव्हा राष्ट्रवादी पक्ष उमेदवारी जाहीर करेल, असे ते म्हणाले.


पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार

अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात २ दिवसांपूर्वी म्हणाले होते की, महाराष्ट्रात भाजप, शिवसेना यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर याबद्दलची भूमिका घेणार आहोत. त्यांनी आमच्यावर खेळी केली आहे. आपलेच उमेदवार घेऊन आपल्याच विरोधात उभे केले आहेत. त्यामुळे काट्याने काटा काढायचा आहे. त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर समोर काय परिस्थिती आहे? कोणाला उमेदवारी दिल्यानंतर ताकदीने काम होईल आणि उमेदवार निवडून येऊ शकेल हे पाहिले जाईल. आपल्याला आपले सरकार आणायचे आहे, असे ते म्हणाले होते. याविषयीचा प्रश्न आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की, आम्ही त्यांची वाट पाहणार नाही. आता त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. आमची यादी जाहीर झाल्यानंतर कोणी राहिले असतील ते त्यांच्याकडे जातील. तेव्हा ती यादी जाहीर करतील. आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत ,असा टोला बापट यांनी लगावला होता.

हेही वाचा - भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप

Last Updated : Oct 3, 2019, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details