पुणे - गिरीश बापट यांना पुण्यामध्ये सातत्याने खासदार संजय काकडे यांनी विरोध केला. तसेच काकडे हे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. बापट यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर संजय काकडे यांचा प्रचारात काय रोल असेल असे बापट यांनी विचारले असता त्यांनी काकडे यांचा माझ्या प्रचारात क्रीम रोल असेल असे उत्तर दिले. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप पक्ष कार्यालयात बापट यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
माझ्या प्रचारात काकडेंचा क्रिम रोल - गिरीश बापट - comment
पक्षपातळीवर उमेदवारीबाबत घेताना कुणालाही डच्चू दिला किंवा डावलले गेले नाही. गुणवत्ता आणि इलेक्टिव्ह मेरीट विचारात घेऊन पक्ष नेतृत्वाने चांगल्या पद्धतीने उमेदवारीचा प्रश्न सोडवला, असे बापट यांनी सांगितले.
गिरीश बापट
महापालिका तसेच राज्य पातळीवरील कामाचाही अनुभव घेतला आहे. आता केंद्रीय पातळीवरील कामाचा अनुभव घेण्यासाठी खासदारकीची निवडणूक लढवत आहे, असे भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले.
उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांची तसेच विरोधकांमधील उमेदवारांचीही आपण भेट घेणार आहोत. निवडणूक लढवताना पायात पाय अडकवण्याचे राजकारण होणार नाही, याची काळजी घेऊ असेही बापट म्हणाले.