महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटीएमच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांची फसवणूक; पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घटना

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या दोन शेतकऱ्याची अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करून फसवणूक केल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

By

Published : Jun 18, 2019, 2:05 PM IST

एटीएमच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांची फसवणूक

पुणे- कॅशलेस प्रणाली वापरत असताना एटीएमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या दोन शेतकऱ्याची अनोळखी व्यक्तीने हातचलाखी करून फसवणूक केल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

एटीएमच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांची फसवणूक

ग्रामीण भागातील शेतकरी, नोकरदारवर्ग अशा प्रत्येकाकडे आता बँकेचे एटीएम कार्ड आहे. २४ तासात कधीही पैसे मिळतात या हेतूने प्रत्येकजण एटीएमचा वापर करत असतो. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान व कमी शिक्षण यांच्या अभावामुळे अनेकदा एटीएमच्या वापराबाबत अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असतो. अशावेळेस शेजारीच असणाऱ्या व्यक्तीची मदत घेतली जाते. मात्र, याच मदतीतून त्या नागरिकांची फसवणूक होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

मंचर शाखेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पंढरीनाथ भोर हे घर खर्चासाठी पैसे काढण्यासाठी गेले. मात्र, त्यांना एटीएम मशीन वापराचे ज्ञान नसल्याने त्यांनी बाजूलाच असणार्‍या एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. परंतु, त्या व्यक्तीने हातचलाखी करत एटीएम पिन विचारुन दुसऱ्या एटीएममधून २० हजार रुपये काढले. याच पद्धतीने त्या व्यक्तीने किरण दरेकर यांचेही ४० हजार रुपये काढून फसवणूक केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. दरम्यान, या अनोळखी व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details